
चमचमीत पुलाव
साहित्य :
एक वाटी तांदूळ
एक वाटी तूर डाळ
अर्धी वाटी चिंचेचा कोळ
मीठ
प्रत्येकी एक चमचा गरम मसाला- तिखट- उडीद डाळ- हरभरा डाळ
कढीपत्ता सात-आठ पानं
दोन चमचे तेल
एक चमचा तूप
अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर
अर्धी वाटी ओलं खोबरं
फोडणीचं साहित्य
कृती :
प्रथम तुरीची डाळ तासभर भिजत ठेवावी. तांदूळ धुऊन ठेवावेत.
नंतर एका पातेल्यात उडीद डाळ, हरभरा डाळ, कढीपत्ता खमखमीत फोडणीत घालून परतावं.
तुरीची डाळ बोटचेपी शिजवावी. फोडणीत तांदूळ घालून परतावेत.
नंतर शिजवलेली तूरडाळ, पाणी, मीठ, चिंचेचा कोळ, मीठ, गरम मसाला; तिखट घालून भात शिजवावा.
शिजत आल्यावर सगळीकडून तूप सोडावं. मंद आचेवर ठेवावा.
वाढताना ओलं खोबरं, कोथिंबीर घालावी.
Leave a Reply