
भोपळा भात
साहित्य :
एक वाटी बासमती तांदूळ
दुधी भोपळ्याच्या लांब जाडसर फोडी अर्धी वाटी
लाल भोपळ्याच्या जाडसर लांब फोडी अर्धी वाटी
अर्धी वाटी साखर
तूप दीड डाव
चमचाभर वेलदोडा पूड
कृती :
तांदूळ धुऊन निथळून तुपावर परतून घेऊन मोकळा भात करावा.
थोडंसंच तूप घालून दुधी आणि लाल भोपळ्याच्या फोडी तळून घ्याव्यात.
नंतर अर्धी वाटी साखरेचा पक्का पाक करून त्यात त्या फोडी घालाव्यात. वेलदोडा पूड घालावी.
नंतर या फोडी मोकळ्या भातात घालून एक वाफ आणावी
कडेनं तूप सोडावं.
Leave a Reply