
भटूरे
साहित्य :
मैदा अर्धा किलो
रवा पन्नास ग्रॅम
मीठ अर्धा चमचा
साखर एक चमचा
बेकिंग पाउडर पाऊण चमचा
दही एक वाटी
तेल
कृती :
मैदा, रवा चाळून मिसळून घ्यावा.
त्यात मीठ, साखर, बेकिंग पावडर मिसळून दही घालून पीठ भिजवावं.
गरज वाटल्यास कोमट पाणी घ्यावं.
भिजवून झाल्यावर पीठ चांगलं मळावं आणि ओल्या कापडानं झाकून उबदार जागेत दोन-तीन तास ठेवावं.
पीठ फार सैल झालं असेल तर थोडा मैदा घालावा.
पीठ लाटता येईल इतकं घट्ट व्हायला हवं.
मोठ्या लिंबाएवढे गोळे करावे आणि गोल आकारात लाटावे.
तेल गरम करून पुऱ्यांसारखे तळून काढावे.
Leave a Reply