
भरल्या वांग्याची भाजी
साहित्य :
एक किलो चांगली कोवळी व ताजी वांगी
किसलेले सुके खोबरे अर्धी वाटी
तीळ पाव वाटी
अर्धी वाटी दाणे
एक चमचा जिरे
दोन चमचे धने
दोन ते तीन चमचे काळा (गोडा) मसाला
ओले खोबरे
कोथिंबीर
तिखट
मीठ
फोडणीचे साहित्य
कृती :
वांग्याची देठ काढून, वांगी उभी चार फाकी होतील, अशी चिरावीत.
वांगे तसेच सबंध राहील व चार सुटे तुकडे न होतील, अशी काळजी घ्यावी.
वांगी चिरून मिठाच्या पाण्यात टाकावीत.
खोबऱ्याचा कीस, तीळ, शेंगाचे दाणे, धने व जिरे हे सर्व भाजून, कुटून घ्यावे. ह्या कुटात चवीप्रमाणे मीठ, तिखट, काळा मसाला व एक-दोन चमचे तेल घालून, सर्व कालवून, वाटून घ्यावे.
वांगी पाण्यातून काढून वरील तयार केलेला मसाला त्यांत भरावा व फोडणी करून त्यात वांगी टाकावीत
मंद विस्तवावर भाजी शिजवावी.
भाजी शिजल्यावर कोथिंबीर व खोबरे घालावे.
Leave a Reply