भज्यांची आमटी

bhajyanchi-aamti-recipe-marathi

bhajyanchi-aamti-recipe-marathi

भज्यांची आमटी

साहित्य :

दोन वाट्या डाळीचे पीठ

एक नारळ

अमसुले

लवंगा

कोथिंबीर

फोडणीचे साहित्य तूप, तिखट, मीठ व गूळ.

कृती :

नारळ खोवून घेऊन खोबऱ्याचे दूध काढावे. नंतर डाळीचे पीठ घेऊन त्यात नारळाचा चव घालून मिसळावे.

चवीपुरते तिखट व मीठ घालून व भज्याच्या पिठाइतपत पातळ होईल, इतके पाणी घालून पीठ भिजवावे

त्या पिठाची लहान लहान भजी तुपात अगर तेलात तळून घ्यावी.

नंतर एका पातेल्यात तुपाची फोडणी करून चार-पाच लवंगा टाकाव्यात व नारळाचे काढून घेतलेले दूध फोडणीस टाकावे.

नंतर बेताचे पाणी घालून थोडेसे डाळीचे पीठ लावावे.

तसेच चवीप्रमाणे तिखट, मीठ व गूळ घालावा. तीन-चार अमसुले व कोथिंबीर घालावी व उकळी आल्यानंतर वरील तळून घेतलेली भजी टाकावीत.

एक उकळी आणून पातेले खाली उतरवावे.

आवडत असल्यास डाळीच्या पिठाऐवजी उडदाची किंवा मुगाची डाळ भिजत घालून व वाटून त्याची भजी करावी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.