
बेसन भात
साहित्य :
एक वाटी तांदूळ
पाव वाटी डाळीचं पीठ
एक मोठा चमचा तेल
एक चमचा तिखट
तीळ एक चमचा
हिंग
हळद
मोहरी
खोबरं
कोथिंबीर
मीठ
कृती :
भांड्यात तेल तापवून मोहरी, हिंग, हळद, तीळ फोडणी घालावे.
त्यावर डाळीचं पीठ खमंग भाजून घ्यावं. शेवटी त्यात तिखट-मीठ
घालून सगळं चांगलं एकजीव करून ताटात पसरून गार होऊ द्यावं.
त्यासोबतच तांदूळ धुऊन निथळून कोरडे होऊ द्यावे. बेसन गार झालं की हलक्या हातानं ते तांदळाला चोळावं. कुकरच्या भांड्यात घालून अडीच
वाट्या पाणी घालून साध्या भाताप्रमाणे प्रेशर कुकरमध्ये हे तांदूळ शिजवावे.
भात शिजला की पापड-लोणच्याबरोबर वाढावा.
चवीत बदल म्हणून बेसनाच्या फोडणीत लसूण, कांदा, हिरवी मिरचीही घालू शकता
Leave a Reply