
बंगाली खिचडी भात
साहित्य :
एक वाटी तांदूळ
एक वाटी मसूर डाळ
पाव वाटी हरभरा डाळ
अर्धी वाटी अगदी छोटे कांदे
एक वाटी बटाट्याच्या फोडी
एक वाटी मटार
गाजराचे चौकोनी तुकडे अर्धी वाटी
अर्धी वाटी तूप
चिरलेलं आले लसूण-मिरचीचे तुकडे एक मोठा चमचा
एक चमचा जिरे
दोन-तीन तमालपत्र
अर्धा चमचा हळद
अर्धा चमचा गरम मसाला
चवीनुसार मीठ
पाच वाट्या उकळतं पाणी
अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर
साजूक तूप
कच्चा मसाला : एकत्र बारीक करून
चार हिरवे वेलदोडे
दोन दालचिनी
चार लवंगा
कृती:
तांदूळ आणि डाळी स्वच्छ धुऊन अर्धा तास भिजत घालाव्या.
जाड बुडाच्या भांड्यात तीन मोठा चमचा तूप तापवून त्यात जिरं, तमालपत्रं, आलं-लसूण-मिरची, कांदे, बटाटे, मटार आणि गाजर परतावं.
हळद, गरम मसाला, डाळ-तांदूळ आणि मीठ घालून सर्व चांगलं परतून घेऊन उकळतं पाणी घालून शिजवावं.
शेवटी त्यात कच्चा मसाला पूड, एक मोठा चमचा तूप घालून एक वाफ आणावी आणि खिचडी उतरावी.
पंधरा-वीस मिनिटांनी वाफ जिरल्यावर कोथिंबीर, साजूक तूप घालून वाढावी.
Leave a Reply