
बैंगन पकोडा
साहित्य :
वांगं एक मोठं
बेसन सहा चमचे
तिखट-आमचूर-ओवा जाड भरडून प्रत्येकी अर्धा चमचा
मीठ
कृती :
वांग्याचे गोल काप करावे, इतर सर्व पदार्थ एकत्र करून त्यात थोडं पाणी घालून घट्टसर पीठ भिजवून घ्यावं.
तयार पीठात एका वेळी एक-दोन काप बुडवून कडकडीत तेलात तळून काढावे.
देताना वरून चाट मसाला भुरभुरावा.
Leave a Reply