
बैंगन भरता
साहित्य :
काळी वांगी मोठी दोन
कांदे मध्यम आकाराचे सहा
तेवढेच टोमॅटो
कोथिंबीर चिरून अर्धी वाटी
चार हिरव्या मिरच्या
तूप दहा चमचे (किंवा जास्त)
मीठ
धनेपूड काश्मिरी तिखट- प्रत्येकी एक चमचा
कृती :
तेलाचा हात वांगी लावून भाजून सोलावी व कुस्करून ठेवावी.
कांदा, टोमॅटो, मिरच्या चिरून घ्यावं.
तूप गरम करून त्यात कांदा सोनेरी रंगावर परतावा.
टोमॅटो, मिरच्या घालून परतावं. मीठ, तिखट, धने पूड घालून टोमॅटो शिजून तूप सुटू लागेपर्यंत परतावं.
मग कुस्करलेली वांगी व कोथिंबीर घालून चार-पाच मिनिटं मंद आचेवर शिजवावं.
Leave a Reply