
अळूची भाजी
साहित्य :
अळूच्या चार गड्या
चुका एक गड्डी
मुळा
खोबऱ्याचे काप पाव वाटी
काजूचे तुकडे पाव वाटी
शेंगाचे दाणे पाव वाटी
चण्याची डाळ अर्धी मूठ
दहा-बारा हिरव्या मिरच्या
चिंच
तीन चमचे काळा (गोडा) मसाला
एक चमचा मेथ्या
कोथिंबीर
दोन ते तीन चमचे डाळीचे पीठ
मीठ
फोडणीचे साहित्य
जिरे
सुके खोबरे
कृती :
अळू स्वच्छ धुऊन व देठ सोलून चिरावे. चुका धुऊन चिरावा.
मुळ्याचे काप करावेत.
चण्याची डाळ व शेंगाचे दाणे भिजत घालावेत.
थोडेसे तेल घालून त्यावर अळू टाकावे.
दोन-तीन वाफा आल्यावर अळू घोटावे व त्यात डाळ व दाणे घालावेत.
चांगले शिजल्यावर त्यात मुळ्याचे काप घालावेत. चिंच कोळून घालावी.
आपल्या अंदाजाने पाणी घालावे.
मीठ, काळा (गोडा) मसाला, काजूचे तुकडे व खोबऱ्याचे काप घालावेत.
नंतर चण्याचे पीठ पाण्यात कालवून लावावे व भाजी चांगली शिजवावी
नंतर मेथ्या, मिरच्यांचे तुकडे व जरा जास्त हिंग घालून फोडणी करावी व ती भाजीला द्यावी.
जिरे व सुके खोबरे भाजून, बारीक कुटून घालावे व कोथिंबीर घालावी.
Leave a Reply