आमसुलाचे सार

aamsulache-saar-recipe-marathi

aamsulache-saar-recipe-marathi

आमसुलाचे सार

साहित्य :

पाच-सहा अमसुले

एका नारळाचे दूध

दोन हिरव्या मिरच्या

अर्धा चमचा जिरे

साखर अथवा गूळ

चवीपुरते मीठ

कोथिंबीर

कृती :

सार करण्यापूर्वी अमसुले अर्धा तास गरम पाण्यात भिजत ठेवावीत.

भिजल्यावर चांगला गुलाबी रंग येतो नंतर ते पाणी काढून घेऊन त्यात नारळाचे दूध घालावे.

गोड अगर आंबट- जशी व जितपत आवड असेल, त्या प्रमाणात साखर अथवा गूळ घालावा आणि मीठ, मिरच्या, जिरे हे सर्व वाटून लावावे.

चिरलेली कोथिंबीर वर घालावी.

हे सार आवडीप्रमाणे गार अगर गरम घेतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.