
सुंदल
साहित्य
• १/२ कप कबुली चणे
• १ मध्यम कांदा, बारीक चिरून (ऐच्छिक)
• २ ते ३ लाल सुक्या मिरच्या
• फोडणीसाठी: २ टीस्पून तूप, चिमूटभर मोहोरी, १/२ टीस्पून उडीद डाळ
• २ टेस्पून ताजा खोवलेला नारळ
• १ कढीपत्त्याची डहाळी
• चवीपुरते मीठ
कृती
चणे ८ ते १० तास भिजवावेत.
• कुकरमध्ये भिजलेले चणे शिजवून घ्यावेत (४ ते ५ शिट्ट्या). चणे आतपर्यंत शिजले पाहिजेत पण अख्खेही राहिले पाहिजेत. शिजवताना पाण्यात १/२ टीस्पून मीठ घालावे.
• कढईत तूप गरम करून त्यात मोहोरी, आणि उडीद डाळ फोडणीस घालावी. उडीद डाळ लालसर होईपर्यंत परतावे. त्यात मिरच्या आणि कढीपत्ता घालावा. ५ ते १० सेकंद परतून कांदा घालावा. कांदा परतला कि नारळ आणि शिजवलेले चणे घालावेत. • मिक्स करून लागल्यास थोडे मीठ घालावे. मंद आचेवर २ मिनिटे वाफ काढावी.
गरमच सर्व्ह करावे.
टीपा:
१) थोडा लिंबाचा रस सुंदलमध्ये छान लागतो.
२) सुंदल हे दुसऱ्या कडधान्यापासूनही बनवता येते. जसे मुग, मटकी, चवळी, काळे आणि हिरवे चणे इत्यादी.
३) कांदा ऐच्छिक आहे. सुंदल दक्षिण भारतात नवरात्रीदरम्यान बनवतात. तेव्हा वाटल्यास कांदा घालू नये.
Leave a Reply