हॉट चिली चिकन

हॉट चिली चिकन

साहित्य

• ६५० ग्रा. चिकन तुकडे
• २ मोठे चमचे टोमॅटो प्युरी
• २ कळी लसुण कापलेली
• २ कापलेली हिरवी मिरची
• २ सुकी लाल मिरची
• १/२ चमचा मीठ
• १/४ चमचा साखर
• १ चमचा मिरची पावडर
• १/२ चमचा तेल
• १/२ चमचे जीरे
• १ कापलेला कांदा
• १/४ चमचे वाटलेली हळद
• ४०० ग्रा. कापलेले टोमॅटो
• ३/४ पाणी
• १ चमचा गरम मसाला
• ४ लांब कापलेली हिरवी मिरची

कृती

• टोमॅटो प्युरी, लसूण, हिरवी मिरची, साबूत, लाल मिरची, तसेच चिकन मसाला ग्राईन्डर मध्ये वाटुन पेस्ट बनवावी.

• मोठ्या गॅस कढईत तेल गरम करून जीरे कडकवावे. नंतर कांदा, तेजपाने टाकुन ४-५ मिनीट फ्राय करावे. ग्राईन्डर मसाला टाकावा आणि हळद टाकावी व २ मिनीटे भाजून टोमॅटो आणि पाणी टाकून कमी गॅसवर घट्ट पेस्ट बनवावी.

• चिकन व गरम मसाला टाकावा आणि कमी गॅसवर २०-२५ मिनीटे किंवा चिकन गळेपर्यंत शिजवावे. नंतर सर्विंग डिशमध्ये काढून वरून लांब कापलेली हिरवी मिरचीने सजवावे व पोळी बरोबर खावे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.