स्वीट कॉर्न उपमा आणि सॅंडविच

स्वीट कॉर्न उपमा आणि सॅंडविच

साहित्य

• २२५ ग्रॅम मक्याचे दाणे (स्वीट कॉर्न)
• हिरव्या मिरच्या
• १ टी स्पू. लिंबाचा रस
• १/२ वाटी खवलेले नारळ
• बारीक चिरलेली कोथिंबीर
• चवीपुरती साखर
• हळद, मीठ
• फोडणीसाठी तेल
• कडीपत्त्याची पाने
• मोहरी, जीरे, हिंग
• बटर किंवा तूप
• ब्रेड

कृती

• मक्याचे दाणे (स्वीट कॉर्न), हिरव्या मिरच्या, मीठ, साखर, लिंबाचा रस घालून भरडुन घ्या.

• गॅसवर भांडे ठेवून त्यात थोडं तेल टाकून त्यात जीरे-मोहरी, चिरलेल्या हि. मिरच्या, कढीपत्त्याची पाने, हिंग टाका. नंतर त्यात भरडलेलं मिश्रण टाकून चांगले हलवून घ्या.

• भांड्यावर झाकण ठेवून ३-४ मिनीटे ठेवा. डिशमध्ये काढून कोथिंबीर व खवलेले नारळ पेरा.

• मक्याचा चवदार उपमा तयार..!

• हा तयार उपमा २ ब्रेड स्लाईसेसच्या मध्ये भरुन बटर किंवा तूप लावून टोस्टरमध्ये भाजुन घ्या व गरमागरम सॉस किंवा चटणीसोबत खायला द्या.

• हे तयार आहे तुमचे स्वीट कॉर्न सॅंडविच.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.