सुरमई फ्राय

सुरमई फ्राय

साहित्य

• अर्धा किलो सुरमई
• १-२ चिंच, हळद, मीठ
• १०-१२ लसूण पाकळ्या,
• १ इंच आलं,
• १ चमचा लाल तिखट,
• १ वाटी ज्वारीचे पीठ,
• रवा ( गरजेनुसार ), तेल.

कृती

• सुरमईचे सगळे तुकडे स्वच्छ धुवून घ्यावेत. चिंचेचा कोळ काढून घ्यावा.

• चिंचेचा कोळ, वाटलेलं आलं, लसूण, हळद, १ चमचा लाल तिखट व चवीनुसार मीठ सर्व एकत्र करून सुरमईच्या तुकड्यांना सर्व बाजूने चोळून घ्यावे व ३-४ तास झाकून ठेवावे.

• फ्राय करायच्या वेळी ज्वारीच्या पिठात रवा मिक्स करून नंतर सर्व तुकडे लावलेल्या मसाल्यासकट दोन्ही बाजूने घोळवून फ्रायिंग पॅनमध्ये पुरेसे तेल घालून एका वेळेला २-३ तुकडे लावून दोन्ही बाजूने खरपूस तळावेत.

• गरमागरम सुरमई फ्राय सर्व्ह करण्यासाठी तयार असतील.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.