साबुदाणा थालिपीठ
साहित्य
• २ वाट्या साबुदाणा
• २ मध्यम बटाटे (शिजवलेले)
• १/२ वाटी शेंगदाण्यांचा कूट
• ५-६ हिरव्या मिरच्या
• अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर
• १ चमचा लिंबाचा रस
• १ चमचा जीरे
• १/२ चमचा जीरेपूड
• चवीपुरते मिठ
• तेल/ तूप
• थालिपीठ थापण्यासाठी प्लास्टीकची शिट
कृती
• साबुदाणे पाण्यात भिजवावे.उरलेले पाणी काढून टाकावे. ३-४ तास भिजत ठेवावेत.
• शिजलेले बटाटे नीट कुस्करून घ्यावे.
• मिरच्या बारीक वाटून घ्याव्यात.
• शेंगदाण्याचा कूट : शेंगदाणे भाजून त्याची साले काढावीत आणि मिक्सरवर बारीक करावेत.
• भिजवलेला साबुदाणा, शिजवलेले बटाटे, मिरच्यांचे वाटण, जीरे, जीरेपूड, शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर, लिंबाचा रस आणि चवीपुरते मीठ घालून नीट मिक्स करावे. मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोळे करावे.
• नॉनस्टीक तव्यावर थोडे तूप सोडावे. मिडीयम हाय हिटवर थालिपीठाला झाकण ठेवून वाफ काढावी. दोन्ही बाजूने खरपूस करून घ्यावे.
• दही, मिरचीचा ठेचा, किंवा लिंबाचे गोड लोणचे यांबरोबर हे थालिपीठ छान लागते.
उपवास नसेल तरीही खाऊ शकता.
Leave a Reply