साबुदाणा चिवडा
साहित्य
• १ वाटी नायलॉन साबुदाणा
• पाउण वाटी शेंगदाणे
• पाव वाटी सुके खोबरे (ऑप्शनल)
• तळण्यासाठी तेल
• १ लहान चमचा जिरेपूड
• लाल तिखट
• चवीपुरते मीठ
• चवीपुरती साखर
कृती
• सर्वप्रथम साबुदाणे तळून घ्यावेत. एका पेपर टॉवेलवर काढून मग एखाद्या पसरट भांड्यात काढावे.
• नंतर शेंगदाणे आणि सुक्या खोबर्याचे पातळ काप तळून घ्यावे. दोन्ही पेपर टॉवेलवर काढून अधिकचे तेल काढून टाकावे.
• तळलेल्या साबुदाण्याला चवीपुरते मीठ, साखर, लाल तिखट, जिरेपूड लावून घ्यावे. त्यात तळलेले शेंगदाणे, खोबर्याचे काप घालावे. सर्व निट मिक्स करावे.
उपवास नसेल तरीही चटपटीत साबुदाणा चिवडा खाऊ शकता.
Leave a Reply