
साबुदाणा खिचडी
साहित्य
• दिड कप साबुदाणा
• १/२ कप बटाट्याच्या काचर्या
• १/२ कप शेंगदाण्याचा कूट
• ४-५ हिरव्या मिरच्या
• २ टेस्पून साजूक तूप
• १/२ टिस्पून जिरे
• चवीपुरते साखर, मीठ
• कोथिंबीर
• १ लिंबू
कृती
• साबुदाणे पाण्यात भिजवावे…उरलेले पाणी काढून टाकावे. ४-५ तास भिजत ठेवावेत.
• कढईत २ चमचे तूप गरम करावे. त्यात जीरे आणि बारीक चिरलेल्या मिरच्या घालून फोडणी करावी. त्यात बटाट्याच्या काचर्य़ा घालून परताव्यात. वाफ काढावी.
• बटाटा निट शिजला गेला कि त्यात साबुदाणे घालावेत. वाफ काढावी.साबुदाणा शिजला कि शेंगदाण्याचा कूट घालावा.
• मिक्स करून नारळ, लिंबाचा रस, चवीनुसार साखर मिठ व कोथिंबीर घालावी आणि दह्याबरोबर खावे.
• खिचडीबरोबर लिंबाचे गोड लोणचेही खुप छान लागते.
उपवास नसेल तरीही खाऊ शकता.
Leave a Reply