
सांडग्यांचा भात
साहित्य:
एक वाटी जुने तांदूळ
मीठ
एक चमचा काळा मसाला
अर्धा चमचा तिखट
अर्धी वाटी कोथिंबीर
एक वाटी तेल
फोडणीचं साहित्य: एक चमचा तिखट, दोन वाट्या सांडगे (कोणतेही)
कृती:
आधी तांदूळ धुऊन ठेवावेत.
एका जाड बुडाच्या पातेल्यात वाटीभर तेल घालून फोडणी करा आणि त्यातच सांडगे तळून घ्या.
सांडगे बाजूला काढून ठेवाआणि तांदूळ, आधणाचं पाणी घालून मऊ मोकळा
भात करावा.
भातात काळा मसाला, तिखट मीठ घालावं.
भात चांगला शिजला की वाढताना वरून कोथिंबीर घालावी.
Leave a Reply