शाही पुलाव

*शाही पुलाव*

साहीत्य :

उत्तम बासमती तांदूळ
बटर / तेल
मिठ
लवंगा
मिरे
जिरे(फोडणी साठी)
पातीचा कांदा
पत्ता कोबी
सिमला मिरची
फ्लॉवर
गाजर
बिन्स
हिरवे मटार
स्वीट कॉर्न चे दाणे
पनीर
पायनॅपल टिटबीट्स (पिकलेल्या अननसाचे तुकडे)
डाळींबाचे दाणे,
केशर
काजुचे तुकडे
किसमीस

पुलाव मसाला साहित्य

धणेपूड( दोन चमचे)
दालचिनी पुड(एक चमचा)
मिरपूड(पाव चमचा)
जिरेपुड(पाव चमचा)

कृती (स्टीम राईस साठी)

तांदूळ स्वच्छ धुवुन २-३ तास पाण्यात भिजवुन ठेवा. एका मोठ्या पातेल्यात बटर वर अथवा गोडेतेलावर लवंगा आणि मीर्‍याची फोडणी करुन पाणी टाका, त्यात चवीपुरते मिठ टाकून पाण्याला उकळी आल्यावर भिजवलेले तांदूळ टाका. पातेल्यात तांदळाच्या किमान चौपट पाणी असेल याची काळजी घ्या.

साधारण १०-१२ मिनिटातच शितं जवळपास शिजतात. आता या पातेल्यातले शिजलेले तांदूळ बारीक छीद्र असलेल्या दुसर्‍या पातेल्यात / भांड्यात ओता, आणि यावर पातेलं उपडं टाका.

१० मिनिटांनी स्टीम राईस तयार झालेला असेल. हा भात प्लॅस्टीक च्या कागदावर मोकळ्या हवेत १०-१५ ठेवा म्हणजे प्रत्येक शित वेगळं होईल.

चिरलेले गाजर, बिन्स, फ्लॉवर हे ५-१० मिनिटं उकळत्या पाण्यात ठेवुन वाफवून घ्या.

कढईत बटर / गोडेतेलावर जिर्‍याची फोडणी करुन प्रथम चिरलेली पत्ता कोबी, आणी पातीचा कांदा परतुन घ्या. यात उर्वरीत शिजवलेल्या भाज्या, काजु, बेदाणे,(किसमीस) घालुन थोडंसं हलवुन घ्या. मग यात स्टीम राईस,टाकून, याच बरोबर पायनॅपल टीटबीट्स, जिरे,मिरे,दालचिनि,आणि धण्याची पुड थोडी थोडी टाकत भात आणि बाकीचे जिन्नस छान एकत्र करा.. हे करतांना शितं तुटणार नाहीत याची काळजी घ्या… सगळ्यात शेवटी केशर घालून मिक्स करा… स्वादिष्ट शाही पुलाव तयार…..

Check Also:

मसाला टोस्ट सँडविच – Masala Toast Sandwich Recipe in Marathi

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.