राजमा

राजमा

साहित्य

• राजमा ,
• कांदा ,टोमॅटो,
• आले – लसुण पेस्ट ,
• बारीक चिरलेली हिरवी मिरची ,
• लाल मिरची पुड ,धणे पुड
• जीरे पुड, आमचुर पावडर,
• बारिक चिरलेली कोथिंबीर,
• चवीनुसार मीठ

कृती

• राजमा भरपुर पाण्यात ७-८ तास भिजत ठेवा. हा राजमा कुकर मध्ये ३-४ शिट्या होईपर्यंत शिजवा. राजमा शिजवताना त्यात थोडे मीठ टाका.

• एका भांड्यामध्ये तेल गरम करा. त्यात हिरवी मिरची टाकुन चांगली भाजू द्या. नंतर त्यात आले लसूण पेस्ट टाकून मिनिट भर चांगले परतू द्या.

• नंतर कांदा टाकून चांगला तांबुस होईपर्यंत भाजा. नंतर टोमॅटो टाकून ३-४ मिनिटे चांगले शिजू द्या.

• नंतर सगळे मसाले टाका आणि हा मसाला चांगला एकत्र करून २-३ मिनिटे भाजू द्या.

• नंतर शिजवलेला राजमा, मीठ आणि गरजे पुरते पाणी टाका. हा राजमा चांगला उकळी येईपर्यंत शिजू द्या.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.