
राईस पोर्तुगाल
साहित्य :
नेहमीप्रमाणेच मऊ मोकळा भात दोन वाट्या
एक मोठा चमचा लोणी
मीठ
ढोबळी मिरची एक चिरून
एक कांदा आणि एक टोमॅटो यांची मीठ घालून पेस्ट
चार क्यूब चीज
सात-आठ पनीरचे लहान तुकडे तळून
दोन-चार तमालपत्रं
कृती:
लोणी गरम करून त्यात तमालपत्रं टाकावीत.
मग कांदा टोमॅटोची पेस्ट घालावी.
ढोबळी मिरचीही परतण्यास घालावी. मग त्यात तयार केलेला भात घालावा.
पनीरचे तुकडे तळून तेही टाकावेत.
पेस्ट, पनीर सर्व घातल्यावर मंद आचेवर खाली तवा ठेवून झाकण ठेवावं. भात वाढताना
चीज किसून घालावं.
Leave a Reply