
मोड आलेल्या मुगाचा पुलाव
साहित्य :
दोन वाट्या मोकळा शिजवलेला भात
दोन मध्यम आकाराचे बटाटे,
एक वाटी हिरवे मोडाचे मूग
एक वाटी जाड किसणीनं किसलेला कोबी
एक वाटी बारीक चवळी मोड आलेली
अर्धी वाटी पनीरचे तळलेले तुकडे
एक टोमॅटो, कांदा बारीक चिरून
मीठ
एक चमचा गरम मसाला.
कृती :
बटाट्याची सालं काढून लांबट फोडी करून घ्या.
धुऊन तांबूस रंगावर तळून घ्याव्या.
पनीरचे लांबट तुकडे करून तेही तळून घ्यावेत.
या दोन्हीला मीठ चोळून ठेवावं.
तूप गरम करून चिरलेला कोबी, कडधान्यं तुपावर परतून घ्यावा.
त्यावर शिजवलेला भात घालून परतावं.
तळलेला बटाटा, काजू, पनीर व मीठ घालून भात सारखा करून घ्यावा.
नंतर गरम वाफेवर ठेवावा आणि मग खाली उतरवावा.
Leave a Reply