
मिश्र भाजी
साहित्य
• ढोबळी मिरच्या (सिमला मिरच्या) चार
• फ्लॉवर अर्धा किलो , मोठे बटाटे दोन
• कांदे मध्यम तीन , लाल टोमाटो दोन-चार
• गाजर एक , मुळा एक
• थोडासा श्रावण घेवडा
• वांगी दोन मध्यम (यात कोबी , लाल भोपळाही चालतो .)
• लसून पाकळ्या सात-आठ
• आलं एक इंच , तेल दोन डाव
• फोडणीचं साहित्य , चवीपुरतं मीठ
• धने-जिरे पूड प्रत्येकी दोन चमचे
• आवडीप्रमाणे लाल तिखट एक वा दोन चमचे.
कृती
• सर्व भाज्यांचे मोठे मोठे चौकोनी तुकडे करून घ्या . हिंगाची हळद न घालता फोडणी करा .
• त्यात आलं-लसूण वाटण घालून सर्व भाज्या एकत्र घालाव्या . व्यवस्थित परतून भाजी झाकण न ठेवता शिजवावी .
• नंतर मीठ घालून परत एक-दोन वाफा आणा . भाजी शिजल्यावर त्यात धने-जिरं पूड , तिखट घालून हलवा . कोथिंबीर बारीक चिरून वर पसरावी .
Leave a Reply