मिक्स दाल पराठा
साहित्य
कव्हरचे साहित्य :
• ३ वाट्या कणीक
• १/४ वाटी बारीक रवा
• मीठ
• १/२ तेल
• ओवा
सारणासाठी साहित्य :
• १/४ वाटी प्रत्येकी तूर, चणा, मसूर, हरभरा डाळ
• १ टे.स्पून आले-लसूण-मिरची पेस्ट
• तिखट
• मीठ
• अनारदाणा/आमचूर पावडर
कृती
• कणीक, रवा, मीठ व तेल घालून भिजवून १ तास ठेवावे.
• नंतर मळून एकसारखे गोळे करावे. डाळी भिजवून २-३ तासांनी रवाळ वाटाव्यात.
• तेल तापवून ओव्याची फोडणी करावी. डाळीचे मिश्रण घालून परतून २ वाफा आण्याव्यात.
• त्यात आले-लसूण-मिरची पेस्ट, तिखट, मीठ, कोथिंबीर, ग. मसाला घालून परतावे.
• आमचूर पावडर घालून उतरावे. कणकेचे व सारणाचे सारखे भाग करुन पराठा करुन लाटावे.
• हे पराठे पौष्टिक व चवदार होतात.
Leave a Reply