मसाला ऑम्लेट

मसाला ऑम्लेट

साहित्य

• २ अंडी
• १ मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला
• १ लहान टोमॅटो बारीक चिरलेला
• २ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
• स्वादानुरूप मीठ
• अर्धा लहान चमचा गरम मसाला
• चिमूटभर कडिपत्तापूड
• अर्धा लहान चमचा जिरेपूड
• १ लहान तेल

कृती

• एका भांड्यात अंडी फोडून चांगली फेटून घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या घालून चांगले एकत्र करा.

• नंतर त्यात गरम मसाला, कडीपत्तापूड आणि मीठ घालून चांगले फेटून घ्या.

• मध्यम आचेवर नॉनस्टिक पॅन ठेवून त्यात तेल गरम करून त्यावर जिरेपूड घालून काही सेकंदांसाठी परतवा.

• नंतर त्यावर अंड्याचे मिश्रण घालून मंद आचेवर दोन्ही बाजूने हलके तपकिरी रंगाचे होईपर्यंत शिजवून घ्या.

• गरमागरम मसाला ऑम्लेट ब्रेड व सॉससोबत सर्व्ह करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.