मलई चिकन

                  मलई चिकन

 

साहित्य
• १/२ किलो चिकन
• १ कांदा, बारीक चिरून
• १ कप फ़्रेश क्रीम
• २ कप दुध
• २ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून
• १ चमचा वेलची पावडर
• १ चमचा आले, बारीक चिरून
• कोथिंबीर, बारीक चिरून
• १/२ चमचा आले पावडर
• ३ चमचे व्हाईट पेपर पावडर
• १ चमचा कसुरी मेथी
• २ चमचे गरम मसाला
• १ चमचा आले-लसुन पेस्ट
• केशर
• बदाम,काजू बारीक कापून
• मीठ

खडा मसाला

• २ – ३ वेलच्या
• १ दालचीनी
• २ – ४ लवंगा
• २ चमचे जिरे
• ३ – ४ काळी मिरी
• १ जावित्रीकृती
चिकनच्या तुकड्यांना आले-लसुन पेस्ट, मीठ, व्हाईट पेपर पावडर चोळून १५-२० मिनिटे बाजूला ठेऊन द्या.

• खडा मसाला मिक्सर मध्ये वाटून घ्या.

• मध्य आचेवर कढई ठेवून त्यात कांदा,हिरव्या मिरच्या आणि क्रीम टाकून कांदा मऊ होईपर्यंत परतावे.

• आता त्यात चिकन टाकून परतून घ्यावे.

• आता त्यात आले, आले पावडर, कोथिंबीर, व्हाईट पेपर पावडर, कसुरी मेथी, गरम मसाला, आणि केशर टाकावे. मध्यम आचेवर १० मिनिटे शिजवावे. वाटल्यास थोडे पाणी घालावे.

• कोथिंबीर, बदाम आणि काजू नी सजवावे.

• नान किंवा गरम भात बरोबर वाढावे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.