मटण चॉप्स

मटण चॉप्स

साहित्य

• १ किलो मटण
• ३ चमचे व्हिनेगर
• ६ लसूण पाकळ्या
• १ मध्यम आकाराचा आल्याचा तुकडा
• अर्धा चमचा मिरचीपूड
• मीठ
• तेल
• ३ मोठे कांदे

कृती

• मटणाचे लहान लहान तुकडे करा. ते एखाद्या जाड लाकडी गोळ्याने किंवा लाकडी हातोड्याने चिरडून सपाट करा.

• मटणात व्हिनेगर, आले-लसूण पेस्ट आणि मिरचीपूड मिक्स करा. हे मिश्रण दहा-बारा तास शक्यतो फ्रिजमध्ये ठेवा.

• त्यानंतर या मिश्रणातून मटण वेगळे करा. तळणाचे तेल गरम करून त्यात मटणाचे तुकडे दोन्ही बाजूंनी थोडे तळून घ्या.

• आच कमी करून मटणात पूर्वीचे मिश्रण, मीठ आणि मिरी घालून ५-१० मिनिटे शिजवा. मटण प्लेटमध्ये काढून घ्या.

• तळणाच्या तेलात गोल चिरलेला कांदा तळून मटण चॉप्सवर पसरवा. ग्रेव्ही किंवा रस्सा तयार करण्यासाठी चॉप्समध्ये अर्धा कप पाणी घालून ते शिजवा.

• त्यातील ग्रेव्ही घट्ट होऊन तांबूस रंगाची झाली की, ते खाली उतरवा आणि गरमागरम सर्व्ह करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.