
मटण कुर्मा
साहित्य
• १/२ किलो मटण
• १ इंच आले
• १०-१२ लसून पाकळ्या
• २ चमचे धने
• ४-५ वेलदोडे
• ७-८ काश्मिरी मिरच्या
• ७-८ काळे मिरे
• ५-६ लवंगा
• २-३ दालचिनीच्या काड्या
• १/२ चमचा मोहरी, शहाजिरे
• १ नारळाची वाटी
• २०० ग्रॅम मटारचे दाणे
• १/२ कप दही
• साखर
• मीठ(चवीनुसार)
कृती
• प्रथम मटणाला थोडी हळद व मीठ लावून प्रेशर कुकरमध्ये शिजवून घ्यावे.
• सर्व मसाला तव्यावर थोडा भाजून घ्यावा व बारीक वाटावा.
• नारळाचे खोबरे मंद अग्नीवर परतून बारीक वाटावे.
• कांदा उभा आणि बारीक चिरून घ्यावा.
• मटारचे दाणे चिमुटभर मीठ घालून वाफवून घ्यावेत.
• एका पातेल्यात २ चमचे डालडा घालून त्यावर कांदा बदामी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यावा.
• कांदा गुलाबी रंगाचा झाला की त्यावर मसाला घालून परतावा.
• खमंग वास आला की थोडेसे पाणी घालावे.
• नंतर खोबरे घालून परतावे व त्यात घुसळलेले दही घालावे.
• तूप बाजूला सुटू लागले की मीठ व अर्धा चमचा साखर घालून मटण घालावे.
• ३ वाट्या पाणी घालून जरा उकळू घ्यावे.
• नंतर त्यात मटारचे दाणे व थोडी कोथिंबीर घालून गरम-गरम भाकरी किंवा भाताबरोबर सर्व्ह करावे.
Leave a Reply