
मटणाचा पांढरा रस्सा
साहित्य
• १/२ किलो मटण
• १ मोठा नारळ
• १ वाटी सुके खोबरे
• ७-८ लसूण पाकळ्या
• १ इंच आले
• दही, खसखस, पांढरे तीळ (२ चमचे)
• २-४ वेलच्या
• ३-४ लवंगा, दालचिनीचे तुकडे
• १/२ चमचा शहाजिरे
• ५-६ हिरव्या मिरच्या
• २ कांदे
• १/२ वाटी तूप (तेल)
कृती
• थोडेसे आले आणि लसूण वाटून घ्यावी.
• नंतर दही, मीठ व वरील आले,लसूण पेस्ट मटणाला चोळून ठेवावे.
• मटणात थोडे पाणी घालून प्रेशर कुकरमध्ये शिजवून घ्यावे.
• नारळाचे दुधकाढावे. खोबरे,आले,लसूण,शहाजिरे,तीळ,खसखस,कांदा बारीकवाटून घ्यावा.
• तुपाची लवंग,दालचिनी घालून फोडणी करावी आणि त्यातशिजलेले मटण टाकून परतावे.
• वाटलेले खोबरेघालून नंतर त्यातनारळाचे दुध घालावे.
• हिरव्या मिरच्यांवर आधणाचेपाणी ओतून नंतरत्या वाटून मटणातघालाव्यात.
• बेताचा दाटसररस झाला किउतरवावे .
• सजावटीसाठी भाज्या सिमला मिरची, baby कॉर्न उकडून वापरल्या तरी चालेल.
Leave a Reply