
भेंडी मसाला
साहित्य
• अर्धा किलो भेंडी,
• २ कांदे , १टोमॅटो,
• तिखट, हळद, , जिरे
• गरम मसाला,
• थोडेसे फ्रेश क्रीम,
• मीठ
कृती
• प्रथम भेंडी स्वच्छ पुसून घ्यावीत.नंतर ती मध्ये उभी चिरावीत.
• अगदी छोटी असली तर तशीच घ्यायची ,जर मोठी असली तर त्याचे दोन भाग करून चिरून घेणे.
• नंतर ती कढई मध्ये तेल तापवून त्यात तळून काढायची.त्यानंतर ते तेल तसेच घ्यायचे
• त्या तेलामध्ये थोडे जिरे घालून त्यात हळद,तिखट घालायचे आणि त्यात कांदे,टोमॅटो उभे चिरून घालायचे आणि एकजीव होईपर्यत परतायचे.
• जरा तेल सुटले की भेंडी घालायची आणि गरम मसाला,मीठ घालायचे.पुन्हा परतायचे.
• भाजी शिजली की,वरून थोडे फ्रेश क्रीम घालायचे. ही भाजी पटकन होते.
Leave a Reply