भटुरे

भटुरे

साहित्य

• १ वाटी दही
• २ वाटी मैदा
• चवीपुरते मीठ
• तळण्यासाठी तेल

कृती

• दही आणि मीठ एकत्र करून घोटावे. त्यात मैदा घालून पिठ भिजवावे. दही आणि मीठ एकत्र केल्याने दह्याला किंचित पाणी सुटते त्यामुळे १-२ चमचे मैदा अधिक लागू शकतो. थोडे तेल घालावे. पिठ मळून घ्यावे. पिठ ४-५ तास झाकून ठेवून द्यावे.

• ४-५ तासांनंतर परत एकदा पिठ मळून घ्यावे. त्याचे मध्यम आकाराचे गोळे करावे (२ ते अडीच इंच आकाराचे). तेल तापत ठेवावे. पिठाच्या फुलक्याच्या आकाराच्या पुर्या लाटाव्यात. खुप पातळ लाटू नये.

• हे भटूरे तेलात मध्यम आचेवर तळून घ्यावे. छोल्यांबरोबर गरमागरम सर्व्ह करावे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.