ब्रेड रोल्स

ब्रेड रोल्स

साहित्य

• स्लाईस ब्रेड
• उकडलेले बटाटे
• मीठ
• हिरव्या मिरच्या
• कोथिंबीर
• थोडे आले

कृती

• ब्रेडच्या कड्या कापून घ्या. ऊकड्लेले बटाटे सोलून घ्या. नंतर किसणीवर किसा.

• त्यात वाटलेल्या मिरच्या, आले व मीठ घालावे. थोडी कोथिंबीर घालून सारण तयार करावे.

• उथळ पातेलीत पाणी घेवून त्यात एकेक स्लाईस टाकाव्यात.

• नंतर दोन्ही हाताच्या तळव्याने दाबून पाणी काढून टाकावे. त्यावर सारण घालून गुंडाळी करावी. कडा बंद कराव्यात.

• ब्रेड ओला झाल्यामुळे छान गुंडाळी होते. नंतर तव्यात तूप टाकून त्यात हे रोल्स तळून काढावेत.

• छान कुरकुरीत होतात.

• हे गरमागरम रोल्स सॉस सोबत सर्व्ह करावेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.