
ब्रेडची भजी
साहित्य
• ब्रेड
• बेसन
• लाल तिखट
• हिंग
• हळद
• चिरलेली कोथिंबीर
• मीठ
कृती
• प्रथम एका भांड्यात बेसन घेऊन त्यामध्ये चवीपुरते मीठ, तिखट, हळद, हिंग व चिरलेली कोथिंबीर घालावी.
• त्यात पाणी घालावे. मात्र पीठ जाडसर राहील, याची काळजी घ्यावी.
• नंतर ब्रेडचे त्रिकोणी तुकडे कापून त्या पिठामध्ये बुडवावे व तळून घ्यावे.
• चटणी किंवा सॉससोबत खाण्यास द्यावी.
Leave a Reply