
बांगडा मसाला
साहित्य
• ४ बांगडे
• १ वाटी खवलेला नारळ
• १ मोठा कांदा
• ५-६ लाल मिरच्या
• थोडी चिंच
• मीठ
• २ मोठे चमचे तेल
• अर्धा चमचा मेथी
• अर्धा चमचा हळद
कृती
• बांगडे कापून त्याचे लहान लहान तुकडे करा. धुवून घ्या.
• नारळ, मिरच्या, चिंच जाडसर वाटून घ्या. कांदा उभा पातळ चिरून घ्या.
• कढईत तेल तापवून त्यात मेथी फोडणीला घाला.
• नंतर हळद, कांदा घालून गुलाबीसर परतवून घ्या.
• त्यात वाटलेला मसाला, मीठ घालून परतवून घ्या.
• त्यात बांगड्याचे तुकडे घाला. पाणी न टाकता बांगडा शिजवा.
• भाकरी किंवा पोळीबरोबर चांगला लागतो.
Leave a Reply