
बटाटा पोहे कटलेट
साहित्य
• अर्धा किलो बटाटे
• पाव किलो जाड पोहे
• ४-५ ब्रेड स्लाइस
• चवीनुसार मीठ
• आले-मिरची पेस्ट
• तळण्यासाठी तेल
कृती
• बटाटे उकडून कुस्करून घ्यावे.
• ब्रेड मिक्सरला लावून बारीक चुरा करावा.
• पोहे पाण्यात भिजवून निथळत ठेवावे.
• आता बटाटे,ब्रेडचा चुरा,पोहे ह्यात मीठ आले-लसूण पेस्ट घालून नीट मिक्स करावे.
• लिंबा एवढे गोळे करून तेलात मंद आचेवर तळावे.
Leave a Reply