
फ्रूट केक रेसिपी ( अंडीयुक्त )
साहित्य :
- १ कप साखर
- १ १/२ कप बटर किंवा डालडा
- २ संत्री
- ५ अंडी
- अडीच कप मैदा
- १ टी स्पून बेकिंग पावडर
- १/२ चमचा मीठ
- ५० ग्रॅम बारीक चिरलेले काजू
- ५० ग्रॅम करंट्स
- ५० ग्रॅम बेदाणा
- २५ ग्रॅम चेरीज्
- २५ ग्रॅम संत्र्याची पाकवलेली साल
- १० ग्रॅम साल काढलेले बदाम
कृती :
डब्याला बटरचा पातळ थर लावून ठेवावा.
ओव्हनचे तापमान ३७५ डि. F. असावे किंवा १५० डि. C असावे.
बटर व साखर खूप फेसून घ्यावे. अंड्यातले पिवळे व पांढरे बाजूला करुन पांढरे खूप फेसून घ्यावे.
पिवळेही थोडे फेसून घ्यावे व बटर साखरेत मिसळावे, नंतर त्यात चाळलेला मैदा, मीठ व बेकिंग पावडर हळुहळु घालावे.
थोड्या मैद्यात (१ टेबल स्पून) फ्रूटचे तुकडे घोळवून तेही मिश्रणात घालावेत.
संत्र्याचा रस थोडा थोडा घालत मिश्रण सारखे करावे.
नंतर बटर लावलेल्या डब्यात घालून वरच्या बाजूला बदामाचे काप लावावेत.
नंतर एक ते दीड तास बेक करावा. केकमध्ये मोठी सुरी घालून काढावी, सुरी खराब न होता बाहेर निघाली कि केक तयार झाला असे समजावे.
हा केक १५ दिवस सहज टिकतो.
Leave a Reply