फ्राइड फिश
साहित्य
• ६७५ ग्रा. कोड माशाचे तुकडे
• १ कापलेला कांदा
• १ मोठा चमचा लिंबाचा रस
• १ चमचा मीठ
• १ चमचा लसणाचा गोळा
• १ चमचा सुखी लाल मिरची पावडर
• १॥ चमचा गरम मसाला
• २ मोठे चमचे कोथंबीर
• २ मोठे टोमॅटो
• २ मोठे चमचे कॉर्नफ्लो्वर
• ३/४ कप तेल
कृती
• माश्यांच्या तुकड्यांना थंड करण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवावे. कांदा, टोमॅटो, लिंबाचा रस, मिठ, लसूण, गरम मसाला, लाल मिरची चुरा आणि कोथंबीर ग्राईन्डर मध्ये बारीक करावी.
• माश्यांच्या तुकड्यांना फ्रिजमधून काढून एका पेल्यात ठेवावे.
• त्यावर वाटलेला मसाला तसेच कॉर्नफ्लोर टाकून व्यवस्थित एकत्र करावे.
• एका कढईत तेल गरम करावे आणि माश्याचे तुकड्यावर मसाला व कॉर्नफ्लोर लावून पकोडे प्रमाणे तळून घ्यावे.
• हिरवी चटणी व पराठ्याबरोबर गरम-गरम खावे.
Leave a Reply