
पोह्याचे वडे
साहित्य : एक वाटी पोहे, पाव वाटी चण्याचे पीठ, एक मोठा कांदा, कोथिंबीर, ओल्या मिरच्या, ओले खोबरे, हळद, जिरे, मीठ, तेल, साखर.
कृती : पोहे धुऊन घ्यावेत. कांदा, मिरच्या व कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी.
नंतर त्यात ओले खोबरे, हळद, जिऱ्याची पूड, चवीप्रमाणे मीठ व साखर घालून, सर्व जिन्नस एकत्र कालवावे.
चण्याचे पीठ पोह्यांत मिसळून, त्यावर दोन चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालून,
वरील कालवून ठेवलेले कांदा, मिरच्या वगैरे साहित्य घालून, मिश्रण चांगले कालवून घ्यावे.
जरूर लागल्यास थोडेसे पाणी घालून, ते मिश्रण आपण वडे करण्याकरिता करतो, इतपत घट्ट करून घ्यावे.
नंतर वडे थापून, ते तेलात तळून काढावे.
खावयास देताना बरोबर एखादी चटणी द्यावी.
Leave a Reply