
पेपर रस्सम
साहित्य
• १ टिस्पून तेल
• १/४ टिस्पून हिंग
• २-३ चिमटी हळद
• ४-५ कढीपत्ता पाने
• २-३ टिस्पून कोथिंबीर
• १ लहान टॉमेटो, बारीक चिरून
• ३-४ लसूण पाकळ्या, ठेचून
• २ ते ३ टिस्पून चिंचेचा कोळ
• १ टेस्पून शिजलेले तुरीचे वरण
• चवीपुरते मीठ
• ::::रस्सम मसाला पावडर
• १ टिस्पून धणे
• १/२ टिस्पून काळी मिरी
• १/२ टिस्पून जीरे
• २-३ सुक्या लाल मिरच्या
कृती
आधी रस्सम मसाला पावडर बनवून घ्यावी. त्यासाठी धणे, जीरे, मिरी आणि लाल मिरच्या वेगवेगळे कोरडेच भाजावे. अगदी हलके भाजावे.
• मसाले गार झाले की त्यांची मिक्सरमध्ये बारीक पावडर करावी.
• पातेल्यात तेल गरम करावे. त्यात हिंग, हळद, लसूण, कढीपत्ता घालून परतावे. १ चमचा रस्सम पावडर घालावी. मंद आचेवर १५-२० सेकंद परतावी.
• चिरलेली कोथिंबीर आणि टॉमेटो घालून टॉमेटो मऊ होईस्तोवर परतावे. नंतर २ कप गरम पाणी घालावे. वरण आणि चवीनुसार चिंचेचा कोळ घालावा. मीठ घालावे. मंद आचेवर उकळी काढावी. रस्सम एकदम पातळ असावे. चव पाहून गरजेनुसार रस्सम पावडर, मीठ किंवा चिंचेचा कोळ घालावा.
हे रस्सम गरमच प्यावे किंवा भातावर सुद्धा घेता येते.
Leave a Reply