
पाव भाजी
साहित्य
• ८ छोटे पाव
• लोणी , फ्लोवर
• आर्धी वाटी मटर दाने ,
• ,कांदे , बटाटे , टोमाटो
• हिरवी मिरची , २ लसून पाकळ्या ,
• आले , लिंबू आणि पावभाजीचा मसाला
• मीठ गरजेनुसार
कृती
• भाजी :
१) सर्व भाज्या बारीक चिरून घ्या .
२) बटाटे ,मातर ,प्लॉवर वाफवून घ्या .
३) थोडेशी लोणी टाकून कांदा परतवून घ्या ,त्यावर ,मिरच्या आले , लसून , परतून घ्या
४) नंतर त्यावर टोमाटो घालून परतावे व त्यावर वाफवून घेतलेल्या भाज्या टाका .
५) मीठ चविनुसार टाकून घ्या . वाटल्यास निंबू रस पण भाजी मध्ये टाकू शकतात .
• पाव :
१) सपाट तव्यावर थोडेसे लोणी टाका .थोडासा गरम मसाला टाकून घ्या .
२) पावाचे सुरीने किंवा हाताने दोन तुकडे करून घ्या .
३) तव्यावर टाकून लालसर करून घ्या .
• (भाजीबरोबर पाव आणि चिरलेला कांदा आणि निंबू सर्व्ह करा , सजावटीसाठी कोथम्बीर चा वापर करू शकतात.)
Leave a Reply