पालकचे ऑम्लेट

पालकचे ऑम्लेट

साहित्य

• एक लहान जुडी पालकची पाने
• अर्धा कांदा बारीक चिरलेला
• ४ अंडी
• मीठ
• मिरपूड
• २ चमचे बटर

कृती

• पालकची पाने स्वच्छ करून धुवून ठेवा. पाण्यात मीठ घालून ते उकळा व त्यात पालकची पाने ५ मिनीटे ठेवा.

• नंतर पाण्यातून काढून सुकी करून घ्या. तव्यावर मध्यम आचेवर १ चमचा बटर गरम करा. त्यावर कांदा सोनेरी होईस्तोवर परतवा.

• नंतर तो कांदा आचेवरून काढून पालकच्या पानांमध्ये घाला. त्यात मीठ व मिरपूड घालून चांगले एकत्र करा. एका वाटग्यात अंडी फोडून चांगली फेटून घ्या.

• तव्यावर मध्यम आचेवर उर्वरित १ चमचा बटर गरम करा. ते वितळले की फेटलेल्या अंड्यात घालून एक मिनीट चांगले फेटा. नंतर त्यात पालकचे मिश्रण घालून चांगले एकत्र करा.

• आता हे मिश्रण पुन्हा तव्यावर घालून मंद आचेवर सेट होऊ द्या. पालकचे ऑम्लेट गरमागरम सर्व्ह करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.