
पनीर मोदक
पनीरपासून बनलेले सर्वच पदार्थ ब-याच जाणांना आवडतात. पनीर टिक्का, पनीर मसाला, मटर पनीर इत्यादी पदार्थ म्हटले, की तोंडाला पाणी सुटते. याच पनीरचा आणखी एक पदार्थ पाहून तुम्हाला तो खावासा वाटेल. तुम्हालाच काय तुमच्या बाप्पालासुध्दा हा पदार्थ आवडेल. चविष्ट आणि रुचकर पनीर मोदक बनवण्याची पाककृती आम्ही तुम्हाला आज सांगत आहोत… चला तर मग करून पाहा बाप्पासाठी खास पनीर मोदक .
साहित्य:
- पनीर कुस्करलेला १.५वाटी
- पिठी साखर १वाटी
- डेसिकेटेड कोकोनट ३,४चमचे
- मैदा १.५वाटी
- तेल २चमचे मोहन देण्यासाठी
- तूप तळण्यासाठी
- दूध १कप मैदा मळन्यासाठी
- वेलदोडे जायफळ पूड १चमचा
- काजू बदाम तुकडे ऐच्छिक
कृती :
- प्रथम मैद्यात कडकडीत तेलाचे मोहन देऊन मैदा दुधाने घट्ट भिजवून झाकून ठेवला
- कुस्करल्येल्या पनीर मध्ये पिठीसाखर,वेलदोडे जायफळ पूड,डे सिकेटेड कोकोनट, काजू, बदाम मिक्स करून सारण बनविले
- मैद्याची पारी लाटून त्यात पनीरचे सारण भरले व मोदक तयार केले
- तयार मोदक तुपात तळून घेतले
- अश्याप्रकारे पनीरचे मोदक तयार.
Leave a Reply