पनीर मखनी

पनीर मखनी

साहित्य

• २५० ग्राम पनीर
• १/४ कप कांद्याची पेस्ट (टीप ५)
• अर्धा ते पाऊण कप टोमॅटो प्युरी (टीप २)
• १ टिस्पून आलेलसूण पेस्ट
• १ टेस्पून काजूची पेस्ट
• अख्खा गरम मसाला ४ मिरीदाणे, १ तमाल पत्र, १ वेलची, २ लवंगा, १ लहान दालचिनीचा तुकडा
• २ चिमटी कसूरी मेथी
• १ टिस्पून धणेजिरेपूड
• १/२ टिस्पून गरम मसाला
• १ टिस्पून लाल तिखट
• ३ टेस्पून बटर
• ३ टेस्पून क्रिम किंवा एवेपोरेटेड मिल्क (टीप)
• चवीपुरते मिठ

कृती

पनीरचे मध्यम आकाराचे चौकोनी तुकडे किंवा २ इंचाचे लांबडे तुकडे करा. तेलामध्ये डिपफ्राय किंवा शालोफ्राय करून घ्या. (टीप ४)

• अख्खा गरम मसाल्याचे जे जिन्नस आहेत ते अगदी हलके, कोरडेच भाजून घ्यावे. खलबत्त्यात हे सर्व मसाले एकत्र कुटून घ्यावे.

• पॅनमध्ये २ टेस्पून बटर गरम करावे. त्यात कुटलेला मसाला घालून काही सेकंद परतावे.

• त्यात कांद्याची पेस्ट आणि आलेलसूण पेस्ट घालावी. मध्यम आचेवर कांदा शिजेस्तोवर परतावे. (साधारण ४ ते ५ मिनीटे)

• कांदा शिजला आणि थोडा रंग बदलला कि टोमॅटो प्युरी घालून मध्यम आचेवर काही मिनीटे शिजवावे.

• टोमॅटो प्युरी शिजल्यावर त्यात कसूरी मेथी, धणेजिरेपूड, गरम मसाला पावडर, लाल तिखट आणि चवीपुरते मिठ घालून मिक्स करावे.

• आच एकदम मंद करावी. काजू पेस्ट आणि क्रिम घालून जोरजोरात ढवळावे म्हणजे क्रिम फुटणार नाही. थोडे बटर घाला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.