पंजाबी कढी-पकोडे

पंजाबी कढी-पकोडे

साहित्य

• कढीसाठी –

• १ १/२ कप दही
• १ १/४ कप पाणी
• २ टेबलस्पून बेसन
• १ /२ टीस्पून हळद
• १ टीस्पून लाल तिखट
• १/४ टीस्पून मेथी दाणे
• १ लाल सुकी मिरची
• १/४ कप कोथिंबीर बारीक चिरून
• २ टेबलस्पून तेल
• पकोड्यांसाठी-
• १ १/२ कप मेथी
• १ १/२ कप बारीक चिरलेला कांदा
• १/४ टीस्पून ओवा
• १/२ टीस्पून जिरे
• १ टेबलस्पून किसलेले आलेमीठ चवीप्रमाणे
• १/४ टीस्पून साखर
• १/२ टीस्पून लाल तिखट
• १/४ टीस्पून हळद
• १ १/२ टीस्पून तांदळाचं पीठ
• वरील मिश्रणात मावेल इतकं बेसन (अंदाजे ४-५ टीस्पून)
• गरज वाटल्यास १-२ चमचे पाणी तळण्यासाठी तेल

कृती

• पकोड्यासाठीचं साहित्य एकत्र करून कालवून घ्या. मीठ घातल्याने त्याला पाणी सुटेल. त्यात मावेल इतकंच बेसन घाला.मिश्रणाला चिकटपणा येईल.गजर वाटल्यास किंचित पाणी घाला म्हणजे पकोडे काढता येतील.

• कढीसाठी एका भांड्यात. दही घोटून घ्या. त्यात बेसन, हळद, तिखट, मीठ साखर घालून घोटून घ्या. नंतर पाणी घालून व्यवस्थित मिक्स करा.

• पातेल्यात तेल गरम करा. आणि त्यात मेथीचे दाणे आणि सुकी मिरची घालून फोडणी करा. लगेचच तयार मिश्रण ओता.

• कढीसाठीचे मिश्रण जाडसर होई पर्यंत ढवळत राहा. नंतर कोथिंबीर घालून मिक्स करा.

• कढईत तेल गरम करून साधारण १ टेबलस्पून मापाचे पकोडे तळून घ्या.

• तयार पकोडे कढीत घालून १ उकळी काढा. आणि गरम पराठा किंवा जीरा-राइस सोबत सर्व्ह करा.

टीप: सर्व्ह करायच्या वेळेस पकोडे कढीत सोडावेत मग उकळी काढून सर्व्ह करावेत. पकोडे आधीच कढीत सोडले तर त्याची मजा कमी होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.