नाचणीचा उपमा

नाचणीचा उपमा

साहित्य

• १ वाटी नाचणी
• १ टी.स्पून मेथी
• १ टे.स्पून मोडाचे मूग
• १ टे.स्पून गाजर-टोमॅटो प्रत्येकी
• २ बारीक चिरुन मिरच्या
• हिंग, मोहरी, आलं-लसूण पेस्ट
• जीरे, हळद, कढीपत्ता
• कोथिंबीर, लिंबूरस
• तेल

कृती

• नाचणीला भिजवून मोड आणून वाफवावे. थोड्या तेलात मोहरी, जीरे घालून फोडणी घालावी.

• यात मिरच्या, कढीपत्ता घालावा. आलं-लसूण पेस्ट घालवी. गाजर किसून, टोमॅटो चिरुन, मूग, मेथ्या सर्व घालून पाच मिनीटे शिजवावे.

• २-३ वाफा आल्या की नाचणी घालावी. मीठ व लिंबूरस घालून ढवळून परत २ मिनीटे गॅसवर ठेवावे.

• गरम गरम उपम्यावर कोथिंबीर व वाटल्यास शेव घालून खायला द्यावे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.