नागपुरी डाळीचे वडे

नागपुरी डाळीचे वडे

साहित्य

• १ वाटी चणा डाळ
• अर्धी वाटी मुगाची डाळ
• पाव वाटी उडदाची डाळ
• अर्धी वाटी मटकी
• ३-४ हिरव्या मिरच्या
• अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
• १ इंच आले
• अर्धा चमचा हळद
• चवीनुसार मीठ
फोडणीसाठी :

• ५ चमचे तेल
• ७-८ लाल मिरच्या
• ४ टहाळे कढीलिंब
• पाव चमचा हिंग
• अर्धा चमचा हळद
• तळण्यासाठी तेल

कृती

• आदल्या रात्री डाळी व मटकी भिजत घालावी. सकाळी स्वच्छ धुवून चाळणीवर निथळत ठेवावी.

• पाणी निथळल्यानंतर भरडसर वाटावी व एकत्र मिसळावी. आले व हिरवी मिरची एकत्र वाटावी.

• लहान कढल्यात किंवा पातेलीत तेल तापले की त्यात लाल मिरच्या व कढीलिंबाची पाने चुरचुरीत होईपर्यंत परतावी.

• त्यात हिंग व हळद घालून खाली उतरवावे. फोडणी गार झाली की मिरच्या व कढीलिंबाची पाने हाताने कुस्करावी व वाटलेल्या डाळीवर ही फोडणी घालावी.

• आले, मिरच्यांची गोळी, मीठ, अर्धा चमचा हळद व कोथिंबीर घालून मिश्रण हाताने कालवावे. त्याचा लिंबाएवढा गोळा घेऊन वडा थापावा.

• तेलात हे वडे मध्यम आंचेवर बदामी रंगावर तळावे. वरील प्रमाणात २५ ते ३० वडे होऊ शकतील. चटणी किंवा सॉसबरोबर खायला द्यावेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.