
दुधी भोपळ्याचा पराठा
साहित्य
• ३०० ग्रॅम दुध्या भोपळा
• ३ वाट्या कणीक
• १ चमचा तिखट
• १/२ चमचा हळद
• १ चमचा मीठ
• २ चमचे धणे-जीरे पूड
• १ चमचा गरम मसाला
• ४ चमचे डालडयाचे मोहन
कृती
• भोपळा किसुन घ्यावा.
• पाणी पिळून बाजूला काढून ठेवावे.नंतर सर्व एकत्र करुन पीठ भिजवावे.
• पीठ घट्ट असावे.जरुर वाटल्यास भोपळ्याचेच काढलेले पाणी वापरावे.
• नंतर त्याचे फुलक्याएवढे परोठे करुन दोन्ही बाजूने शेकावेत व नंतर बाजूने तूप सोडावे.
Leave a Reply