
दाल मखनी
साहित्य :
उडीद डाळ एक वाटी
राजमा (लाल घेवडा) अर्धी वाटी
कांदे दोन
टोमॅटो दोन
आलं+लसूण वाटण दोन चमचे
हिरव्या मिरच्या दोन
मीठ
गरम मसाला एक चमचा
तिखट अर्धा चमचा
जिरे एक चमचा
चिमूटभर हिंग
तूप तीन चमचे
फ्रेश क्रीम तीन चमचे
कृती :
डाळ आणि राजमा धुऊन एकत्रच कमीत कमी दोन-तास भिजत घालावे. कांदा-टोमॅटो अगदी बारीक चिरून घ्यावे.
डाळ आणि राजमा भिजल्यानंतर त्यातलं पाणी निथळून टाकावं.
त्यात वाटलेलं आलं-लसूण, मीठ आणि हिरव्या मिरच्या व तीन-चार वाट्या पाणी घालून प्रेशर कुकरमध्ये शिजवावं.
(एक शिट्टी झाल्यावर गॅस मंद करून पंधरा मिनिटं शिजवावं.)
कुकर उघडल्यावर पाणी कमी वाटल्यास आणखी पाणी घालावं. मंद आचेवर पंधरा-वीस मिनिटं शिजत ठेवावी.
एकीकडे तडका तयार करावा- तूप गरम करून त्यात हिंग-जिरे घालावं. मग कांदा घालून सोनेरी तपकिरी रंग होईपर्यंत परतावं.
टोमॅटो घालून परतावं. तिखट व गरम मसाला घालून शिजत असलेल्या डाळीवर लगेच हा तडका ओतावा.
आवडत असल्यास वरून क्रीम किंवा दोन चमचे पांढरं लोणी घालावा, तंदुरी रोटी किंवा नान बरोबर गरम वाढावी.
काही लोक सालीसकट उडीद डाळीऐवजी आख्खे उडीद वापरतात.
Leave a Reply