
दही कोळंबी
साहित्य
• २ वाटी सोललेली कोळंबी
• ३ कांदे
• ७-८ हिरव्या मिरच्या
• आल्याचा मोठा तुकडा
• २ वाटी दही
• ४ चमचे तेल
• मीठ
• १ चमचा साखर
• अर्धा चमचा हळद
• १ चमचा जिरे
• ७-८ मेथी दाणे
कृती
• कोळंबी स्वच्छ करून धुवून घ्या. कोळंबीला मीठ, हळद लावून ठेवा.
• जिरे, मेथीची पूड करून ठेवा. आले, हिरव्या मिरच्या बारीक वाटून घ्या.
• कांदे उभे, पातळ चिरून घ्या. दही घुसळून ठेवा.
• जाड बुडाच्या पातेल्यात तेल गरम करून त्यात कांदा गुलाबीसर परतवून घ्या.
• नंतर त्यात आले, हिरव्या मिरच्या घालून परतवा.
• त्यात अर्धा पेला पाणी घालून कोळंबी शिजवून घ्या.
• कोळंबी शिजली की त्यात घुसळलेले दही घाला.
• त्यात जिरे-मेथीची पूड घाला.
Leave a Reply